जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.

दिनांक १० सप्टेंबर २०१५ रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे औचित्य साधून टिळक आयुर्वेद महाविदयालय, पुणे येथे जनजागृतीपर परिसंवाद /चर्चासत्राच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमामध्ये महाविदयालयाच्या प्राचार्य डॉ सरोज पाटील, उपप्राचार्य डॉ. मिहीर हजरनवीस व डॉ. घनश्याम डोंगरे यांनी मुलांशी आत्महत्या या संवेदनशील विषयावर संवाद साधून मुलांचे मनोबल वाढवले. संवादामध्ये नकारात्मक विचार काढून सकारात्मकतेची ऊर्जा दिली व कोणत्याही प्रकारचे ताणतणाव अथवा समस्या निर्माण झाल्यास शिक्षक, विश्वासातील व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रवृत्त केले.

Scroll to Top