अॅण्टी रॅगिंग समितिमार्फत ‘भोई प्रतिष्ठान’ चे संचालक डॉ. मिलिंद भोई यांचे दिनांक २७/६/२०२५ रोजी, सकाळी ११ वा. टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘निमा हॉल’ येथे ‘रॅगिंग एक मानसिक विकृती’ हयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सरोज पाटील, उपप्राचार्य डॉ. मिहीर हजरनवीस, उपप्राचार्य डॉ. संगीता साळवी, अॅण्टी रॅगिंग समितीच्या सचिव डॉ. मंजिरी देशपांडे, डॉ. इंदिरा उजागरे, डॉ. अपूर्वा संगोराम तसेच इतर अध्यापक हजर होते. हया कार्यक्रमास प्रथम वर्ष व व्दितीय वर्षाचे एकूण १२२, व प्रथम वर्ष पदव्युत्तर वर्षाचे २ विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. मिलींद भोई यांनी ‘रॅगिंग एक मानसिक विकृती’ वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे रॅगिंग करू नये व होताना त्यास मदत करू नये यासंबंधी विद्यार्थ्यांना
प्रबोधन दिले.
यानंतर प्रश्नोत्तरे झाली. विद्यार्थी वर्गाने विचारलेल्या प्रश्नांना डॉ. मिलिंद भोई यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
डॉ. मिलिंद भोई व उपस्थितांचे औपचारिक आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली!