2021-22 पासून NCISM द्वारे १५ दिवसीय Transitional curriculum नावाची संकल्पना प्रथम वर्ष बीएएमएस विद्यार्थ्यांसाठी राबवण्याची अंमलबजावणी करण्यात आली.या curriculum चे सलग हे तिसरे साल. ह्यावर्षी हा उपक्रम राबवण्याची व सांभाळण्याची धुरा ही रचना शरीर विभागावर सोपवण्यात आली होती. नीट परीक्षार्थी ते प्रथम वर्ष वैद्यकीय पदवी पूर्व विद्यार्थी यातले अंतर कमी करणे तसेच ह्या दरम्यान अनेक चढाओढींचा, आव्हानांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. तसेच विविध प्रांतातून,विविध कौटुंबिक सामाजिक वातावरणातून विद्यार्थी एका महाविद्यालयात प्रवेशित होतात.अशा वेळेला त्यांना महाविद्यालयातून आधाराची गरज असते .आपल्या जबाबदारीची जाणीव समजून घेण्यासाठी, एकीय व आपुलकीची भावना तसेच आपणही पुढे याच महाविद्यालयाचा भाग असणार आहोत;या उद्देशाने यावर्षी दिनांक ८ मार्च २०२३ ते १५ मार्च २०२३ या दरम्यान हा Transitional curriculum चा उपक्रम घेण्यात आला.